मराठी भाषा अध्ययन


COURSE FEATURES

  • Starts 1 June 2018
  • Duration 7 Weeks
  • Class Duration 21 Hrs
  • Level All
Course Price: ₹ 3000
ENROLL THIS COURSE

कोर्सची ओळख

मराठी भाषा अध्ययन या कोर्समध्ये मराठी व इंग्रजी माध्यमात शिकवणारे शिक्षक आणि पालक यांच्यासाठी सत्र आहेत. प्राथमिक स्तरामध्ये मूलभूत वाचन व लेखन ही कौशल्ये विकसित करताना कोणती पद्धत वापरावी याविषयी मार्गदर्शन केले आहे. माध्यमिक स्तरावर 4 ते 7पर्यंतच्या व्याकरणाचा आढावा घेताना संकल्पना स्पष्ट करण्यावर भर देण्यात आला आहे. प्रगत स्तरावर प्रयोग, अलंकार, वृत्त हा तुलनेने अवघड वाटणारा भाग स्पष्ट केला आहे. शिक्षकांना शिकवताना वापरायच्या क्लृप्त्या व कृतिपाठ उपयोगी होतील. तसेच व्याकरणाच्या संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होईल.

मराठी भाषा अध्ययन हा कोर्स तीन भागात उपलब्ध आहे.
प्राथमिक : ३ तास / १ आठवडा
माध्यमिक : ९ तास / ३ आठवडे
प्रगत : ९ तास / ३ आठवडे

तुम्ही काय शिकाल?

मुलांनी ह्या विषयात काय समजून घ्यावे, काय वाचावे, काय लक्षात ठेवावे मुलांचा सहभाग कसा असावा अशा सर्व गोष्टींचे मार्गदर्शन ह्या व्हिडिओमधे केले आहे. तुम्ही यात सांगितलेल्या गोष्टी करून पाहा आणि तुमच्या लक्षात येईल की तुमचे शिकवणे अधिक चांगले होत आहे आणि मुलांना विषय आवडतो आहे.

  • प्रत्येक सत्रात काही चित्रफिती (व्हिडिओ) आणि त्याला पूरक कृतिसत्रे आहेत!
  • संदर्भासाठी विस्तृत टिपा दिल्या आहेत!
  • प्रत्येक सत्राच्या शेवटी चाचणी आहे!
  • चाचणी दिल्यानंतर काही अहवाल तुम्ही पाठवायचा आहे!
  • कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्र देण्यात येईल!

Curriculum For This Course

ABOUT INSTRUCTOR

image
सुनीला गोंधळेकर

M. A. (संस्कृत), M. Phil (मराठी)


टिळक महाराष्ट्र विद्यापीठात अध्यापन
परदेशी विद्यार्थ्यांनामराठीव हिंदी अध्यापन
अभिजात भाषा आणि साहित्य या ज्ञानमंडळासाठी मराठी विश्वकोशाची समन्वयक